Saturday, 12 May 2018

   "पाऊस आणि तो"

#newwriteup
#premonsoon
#चहाप्रेमी
                        

पाऊसाळ्यातील एक रविवार, थोड़ा उशीराच उठायचा दिवस.
पण आज जाग आली लवकर, ऊबदार दुलईतुन बाहेर येणे कठीण अाणि त्यात "ती" मिठी सोडवणे त्याहून जीवघेणे.
"पर जो चाय के दिवाने होते है, वो लोग अक्सर एेसी कुरबानीया दे दिया करते है...!"
हळुच ती गुंफण सरसावत,  दुलईची ऊब "ती"च्या स्वाधीन करत "तो" उठला.
Brush वगरे आटोपुन सरळ स्वयंपाक घरात  entry...!

स्वयंपाक घरातल्या खिडकीतुन समोर दिसणारा तो ढगांनी व्यपलेला डोंगर त्याला अजुन स्फूर्ती देउन गेला.

 नेहमीचं काॅपर बाॅटमच लख्ख चहाच भांड, नेहमीच्याच जागेवर ठेवलेलं.
 पटकन उचलुन "toughned glass top" च्या "shining" मानणार्या गॅसवर ठेवलं. "Special occasions" करता वेगळ्या ठेवलेला La` opala च्या सेट मधुन दोन नाजुक कप काढलेत.
गॅस "On" केला तीच्या आवडीनुसार अर्धा कप पाणी गॅसवरच्या भांड्यात ओतले...
कोंबट भांड्यामुळे सरररररररर आवाज! ह्याने अररररर! करत जीभ चावली.
bedroom च दार हलकेच उघडून ती झोपली आहे ना ह्याची शाश्वती करून चोर पावलांनी 
स्वारी धावत स्वयंपाक घरात दाखल...!
पाण्याला उकळी फुटलेली. गॅसवरच्या कपाटातुन चहा साखरेेचे डबे ओट्यावर आलेत.
लगेच त्या उकळत्या पाण्यात साखरीचा गोडवा पडला आणि मागोमाग चहाने त्या गोडव्याला आपल्या सोनेरी रंगाने रंगवून टाकले आणि सगळी कडे एक मोहग गंध दरवळु लागला...
त्यात कमी होती ती आल्याची!
त्याने पटकन फ्रिज़ उघडला, आलं किसलं, चहात टाकलं.
दुधबुआ बाजुला बसुन हे सगळ पहातच होते, "मेरी बारी कब आएगी "!
त्याच्यातला उत्साह आणि प्रेम ओसांडुन वाहत होत...
चहा उकळला आणि त्याने चहात दूध घातले
त्याची नजर खिडकी बाहेर उमलल्या सुंदर गुलाबावर खिळली 

इकडे चहाला उकळी आली आणि चहा उटूऊतु जाऊलालगला 
त्याने पटकन गॅस वीजवला आणि चहाच्या भांड्यावर झाकण ठेवलं 
 "चहा" उतु जायचा वाचला...!

पटकन जाऊन त्याने ते गुलाबाचे फुल सॉरी म्हणत तोडले 
तीच्या आवडीचा टोस्ट आणि गुलाब Dinning Table वर सजवले...

स्वयंपाक घरात जाऊन चहा कपात गाळला,  चहा फ्ककड झाल्याचं दरवळणार्या सुगंधानेकळवलं...
केसांचा अंबाडा बांधत ती तेवढ्यात बाहेर आली.. 

दोघांची नजर भीडली, आणि ते चेहरे हस्याने खुलले...!
दोघांनी चहाचा एक घोट घेतला आणि बाहेर पाऊस पडु लागला...!

तळ टिप :-
१) पाऊस हवा असल्यास वरील  कामी येणार नाही. त्या करता झाडे लावावी आणि जगवावी.
२) वरील लिखाण वाचतांना ज्यांच्या नाकात चहाचा सुगंध दरवळला ते खरे चहा प्रेमी "समजावे" व ज्यांना हा अनुभव आला नाही ते बायको / नवरा प्रेमी "मानावे ".
 हसताय काय चला चहा करा आणि पाऊसाळ्याचा आस्वाद घ्या...!

ओळख असावी...  किमान चहाला बोलावावे...
पौर्णिमा देशपांडे 

Wednesday, 21 February 2018

जीवन दान

"जीवन दान"
मेघनाच्याडोक्यात विचारांची ये जा सुरु होती. पहाटेच्या नीरव शांततेत अकस्मात होणाऱ्या गजराने ती अचानक भानावर आली, 5.30 अरे बापरे! अचानक तिला जाणीव झाली की आजचा दिवस रोजच्या दिवसां पेक्षा वेगळा होता. घाई घाई ने उठून ती खोलीच्या बाहेर आली. अमृतच्या खोलीत तिने डोकाउन पाहिलं, तो साखर झोपते होता. अमृत, अजय आणि मेघनाचा एकुलता एक मुलगा! त्याच्या कड़े ती कौतुकाने बघत होती. तिच्या लगेच लक्ष्यात आल की अमृत बहुदा उशीरा झोपला असावा. त्याला न उठवता ती थेट स्वयंपाकघरात गेली आणि चहा मांडला. बाहेर गुलाबी सूर्य किरण पसरले होते. स्वयंपाक घरतल्या खिड़की बहेरच्या अंब्याच्या झाडावर कोकिळा गात होती. हे सगळं आधी मेघनाला स्फूर्ती देत असे पण आजकाल तिला ह्या गोष्टी निरस वाटत होत्या. तिच्या मगोमाग अजय पण उठला बाहेर येता येता त्याने पण अमृत कड़े डोकवले. तो स्वयंपाकघराच्या दाराशी येऊन मेघनाला म्हणाला, "काय आज चिरंजीव उठले नाहीत अजुन", "नाही रे तो इतका गाढ झोपलाय, झोपु देत, रात्री उशीरा झोपला असावा कदाचित. मुद्दामच उठवलं नाही त्याला, शांत झोप लागली आहे बरेच दिवसांनी, माला तर झोपच नाही लागली..." मेघना म्हणाली. अजय हसत तिची खोड़ काढत तिला म्हणाला, "अग बराव्वीचा निकाल अमृतचा आहे तुझा नाही!. सगळ छान होईल बघ, मस्त टक्क्यान्नी उत्तीर्ण होतील आपले चिरंजीव काळजी नसावी!".
आज अमृतचा बराव्वी चा निकाल होता, त्याला साइंटिस्ट व्हायचे होते, आणि त्यानी त्या करता महिनतही तशीच केली होती. मेघना अजयला उत्तर देत म्हणाली, "हो रे अमृत ने तर महिनत केलीच आहे ,पण मला सारख नूर बद्दल वाइट वाटतं इतकी हुशार मुलगी अस का म्हणुन व्हाव तिच्या सोबत तिला खुप शिकायचे आहे रे..."
नूर म्हणजे मेघनाच्या घरी काम करणाऱ्या तबस्सुनची मुलगी. ती आणि अमृत दोघे सोबत अभ्यास करायचे आणि मेघना दोघांचा अभ्यास घ्यायची अगदी लहानपणा पासून. नूर पण हुशार मुलगी होती. मेघना आणि अजय ह्यांनी नूरला अगदी मुली सारख वगवलं होतं. पण मागच्या कही महिन्यां पासून नूर सारखी आजारी रहायची. एक दिवस मेघना स्वताः तिला डॉक्टर कड़े घेऊन गेली सगळ्या टेस्ट झाल्यावर त्यांच्या लक्ष्यात आले की नूरच हॄदय खुप नाजुक आहे आणि अश्या परिस्थितीत फक्त एकच उपाय होता तो म्हणजे "हार्ट ट्रांसप्लांट!"
नूरचं स्वप्न होतं, तिला खूप शिकायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं. तिचं ते स्वप्न आता तिला अशक्य वाटत होत. तबस्सुनची परिस्थिती हलाखीची होती. नूर तीचा खुप मोठा आधार होती आणि तिची ही अवस्था ऐकुन तबस्सूनच्या पायखलची जमीनच निसटली होती. ती घरकामं करून कसंबसं तीच घर चालवत होती त्यात आधीच चार पोरं आणि नवऱ्याच्या आजारपणात तिचा खुप पैसा खर्च झाला होता. नूरच्या शिक्षणाचा खर्च मेघना आणि अजय करत होते. पण आता तिच्या ह्या आजारपणा करता येणारा खर्च तबस्सूनला न परवडणारा होता. ती एका समाज सेवीकेच्या घरी काम करायची आणि तिला नूरची माहिती देताच तिने तिच्या कडून सगळे प्रयत्न सुरु केले होते.
तबस्सून दुधाचे पाकीट घेत आत आली तेव्हा 7 वाजले होते आज तिला कामं लवकर आटोपून नूर सोबत कॉलेजला जायचे होते. अमृत उठला आणि बाहेर आला, अजय पेपर वाचत सोफ्यावर बसला होता आणि मेघना स्वयंपाक घरात तिची कामं उरकत होती. तबस्सून मेघनाला त्या समाज सेविके बद्यल माहिती देत होती,"दिदी, वो भार्गवी दिदी हर तरफ से कोशीष कर रही है पर...", तेवढ्यात नूर आली आणि तबस्सून तिथेच बोलायचं थांबली. नूर आणि अमृत आज खुश पण होते आणि थोडी भीती पण होती त्यांच्या मनात. अजय नूरला चिडवत म्हणाला, "अरे नूर तू पेढे पण घेऊन आली, निकाल तर कळू देत, उगाच पेढे वाया नको जायला काय?", नूर रागावून मेघनाला म्हणाली, "देखीये चाचीजी, भाईजान को हमपे भरोसा नही", मेघना तिला हसत म्हणाली, "अगं तो तुझी खोड काढतोय, तू लक्ष नको देऊस".
अजय आणि अमृत त्याच्या कॉलेज मध्ये पोहोचले. ते थेट प्रिन्सिपॉलच्या केबिन मध्ये जाऊन उभे होते. एका प्युननी त्यांना तसा निरोप दिला होता. केबिन मध्ये जाताच प्रिन्सिपॉल सरांनी दोघांचे अभिनंदन केले आणि अमृत त्यांच्या कॉलेजमधून पहिला आलाय आणि नेहमी प्रमाणे नूर दुसरी आली आहे असे सांगत असतांनाच नूर आणि तबस्सून तिथे आलेत. दोघे खूप खुश होते सगळ्या मित्र मैत्रिणींशी आणि शिक्षक वर्गाशी ते दोघे उत्साहाने बोलत होते.
मेघनाला खुप उत्सुकता होती पण तीचा फोन न अजय उचलत होता ना अमृत. ती आता अस्वस्थ झाली होती, अंगणातुन आत, आतून अंगणात फेऱ्या मारत होती." अजून कसे आले नाहीत हे लोक, फोन पण उचलत नाहीत काय झाल असेल?". आता उत्सुकतेची जागा काळजी ने घेतली होती. तीला गाडीचा आवाज आला तशीच ती बाहेर धावली. पहाते तर अजय आणि अमृत दोघे गाडीतून उतरून जड पावलांनी घराकडे येत होते आणि दोघांचेही चेहरे पडलेले होते. मेघनाच्या काळजाचा ठोका चुकला! तीने अमृत चे हात आपल्या हातात घेतलेआणि विचारले, "काय झालं अमृत, तुझा चेहरा असा का दिसतोय?" अजय अरे तू तरी सांग, मी कधीची फोन करतेय?" नूर कुठंय? त्या दोघी तुमच्या सोबत येतील असं वाटलं होतं मला...! अरे बोला काहीतरी...!, आता मेघना रडणार तेवढ्यात अजयला हसू फुटले आणि दोघे मिश्किल पणे हसू लागले. अमृतने आईला कडकडून मिठी मारली, "मी कॉलेज मधून पहिला आलोय आई आणि नूर दुसरी!" असे म्हणत मेघनाला तो आत घेऊन आला. मेघनाच्या डोळ्यातली काळजीची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली होती. ती त्याच्या डोळ्यातल्या आनंदाला आणि उत्साहाला निहाळत होती. तिचे आणि अजय चे डोळे पाणावले होते. ती पटकन आत गेली देवाजवळ दिवा लावला तिघांनी मग देवाला नमस्कार केला अमृत ने पेढ्याचा नैवद्य दाखवला, आई वडिलांना नमस्कार केला, मेघना ने त्याला पेढा भरवला आणि तेवढ्या मेघनाचा फोन वाजला, " हॅलो आई, अगं अमृतला 97% पडलेत, हो... देते त्याला", "हॅलो आजी इथूनच नमस्कार तुला आणि आजोबांना पण सांग नक्की...! आईला देतो" म्हणत त्याला आलेला फोन त्याने घेतला. इकडे अजयचा फोन वाजला, "हॅलो बाबा हो, अमृत कॉलेज मधून पहिला आलाय, देतो थांबा. आजोबा, तुमचे आशीर्वाद होते ना सोबत, आजीला आणि तुम्हाला माझा नमस्कार!", परत तो त्याच्या फोन मध्ये गुंतला...
एकसारखे फोन वाजत होते आणि आई वडील पोराचं कौतुक दिमाखात सगळ्यांना सांगत होते. तेवढ्यात अमृत तयार होऊन बाहेर आला, "आई बघ तू घेतलेला tshirt घातलाय मस्त फिटिंग आहे बरं, माझ्या करता तूच बेस्ट शॉपिंग करते" म्हणत तो बुट घालूलागला, "अरे आता कुठे निघालास जेऊन जा!" नाही आई सगळे पार्टी मागताहेत, बाबा जरा पैसे देता का..?"
"अरे, त्यात काय आज तो हम बोहोत खुश है, ये लो और एन्जॉय करो...!" अजय ने त्याला पैसे दिलेत आणि अमृत निघाला जाता जाता "मी उशीरा येईल काळजी नसावी!" म्हणत गाडीला किक मारली आणि थेट गेट पार केले, मेघना त्याच्या कडे तो वाळे पर्यंत बघत राहिली.
अजय आणि मेघना खुश होते सारखे फोन सुरूच होते. त्या दोघांना अमृत शिवाय जेवण कसं जाणार? पण जेवले आणि अजय ने सुट्टी घेतली होती, मेघनाला रात्रभर झोप नव्हती. ते दोघे जरा आडवे झाले आणि कधी त्यांना झोप लागली ते कळलेच नाही.
संध्याकाळचे 4 वाजले होते, अजयच्या मोबाईलच्या रिंग ने दोघांची झोप उडाली. अजयने अर्धवट झोपेत डोळे चोळत फिने रेसिव्ह केला, तो नंबर unknown होता. "हॅलो, तुम्ही अजय जोशी का?, "हो बोलतोय, आपण कोण?." " मी इंस्पेक्टर खांझोड़े, साहेब तुमच्या मुलाचा अपघात झालाय, तबड़तोब "नव जीवन", होस्पिटलला या."अजय दोन मिनीटं स्तब्ध झाला, नाको ते विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले, मेघना अजय ला बघून घबरली, " काय झाल अजय? कुणाचा फ़ोन होता? अरे, बोल ना काय झालय?", अजय ने मेघनाला सांगताच ती तशीच उठली तीने पर्स घेतली सगळे कार्ड्स पैसे सोबत घेतलेत आणि घाई घाईत दोघे बाहेर पडत होते तेवढ्यात, मेघनाच लक्ष अमृतच्या हेलमेट कड़े गेलं, न विसरता हेलमेट घलणारा मुलगा आज कसा विसरल? तिच्या डोक्यात नको ते विचार आलेत आणि तिच्या डोळ्या समोर अंधार पसरला पण तिनी स्वतःला सांभाळून घेतलं आणि दोघं हॉस्पिटलला पोहोचले. तिथे खूप गर्दी पाहून दोघे घाबरले, इन्स्पेक्टर समोरच उभे होते अजयने विचारले काय झालं साहेब?, मी अजय, अजय जोशी, अमृतचा बाबा मी! इंस्पेक्टरांनी अजयची आणि डॉक्टरची भेट घालून दिली, "डॉक्टर, अमृत कसाय? कुठे लागल त्याला? फ्रैक्चर आहे का? ऑपरेट नही ना कराव लागणार? प्लीज डॉक्टर कही बोला प्लीज!" डॉक्टर ने अजयला केबिन मधे नेलं बसायला सांगितल. अजय आता थार्थरत्या हतांनी खुर्ची ओढ़त बसला, "डॉक्टर..." म्हणत अजय चे डोळे पाणावले होते, त्याला पुढे बोलता येईना, डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव, त्या केबिन मधला तणाव, शांतता त्याला आता सहन होत नव्हती. शेवटी डॉक्टर म्हणले, "हे बघा मिस्टर जोशी, मी तुमच्या भावना समजू शकतो, आम्ही सगळ्या बाजूंनी प्रयत्न केला, व्ही आर सॉरी टू से,अमृत इज नो मोर विथ अस... ब्रेन डेड! तो वेंटिलेटर वर आहे पण, परत कधीच डोळे उघडू शकणार नाही!"
अमृतssssssss! नाही! हे , हे खोटं आहे, डॉक्टर प्लीज त्याला वाचवा मेघना दारात उभ्या उभ्या कोसळली...! आता अजयचा श्वास थांबला होता, त्याच्या डोळ्या पुढे अंधारी अली होती तो शून्यात बघत होता, " डॉक्टर अमृतचा आज निकाल होता तो कॉलेज मधून पहिला आलाय आणि त्याला सायंटिस्ट व्हायचंय असा कसा तो हार मानेल? नाही मी त्याला हारु देणार नाही!
तेवढ्यात अजय चे मित्र तिथे आलेत मेघनाला आणि अजयला आवरणं अशक्य होतं त्यांचा आक्रोश असहाय्य होता. डॉक्टरने अजयला आत बोलावले, " मिस्टर जोशी, मला माहितीय की ही वेळ हे बोलण्याची नाही पण मी एक डॉक्टर आहे त्या नात्याने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या कडे वेळ कमी आहे आणि तुमचा निर्णय लवकरात लवकर मिळावा अशी आशा आहे. अमृतला जीवंत ठेवण्याचा एक उपाय आहे...! अजयने डॉक्टरचे पाय धरलेत, "डॉक्टर तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे...", "अजय उठ... आमच्या कडे खूप कमी पेशंट्स येतात जे ब्रेन डेड असतात... आणि फक्त अश्याच लोकांचे अवयव आम्ही गरजू लोकांना ट्रान्सप्लांट करू शकतो, एखाद्या गरजू व्यक्तीला अवयव दान करून त्याचा जीव वाचवू शकतो पण ह्याला तुमची सहमती लागेल..."इन्स्पेक्टरचे NoC लागेल आणि हे सगळं कायद्याने होईल by "THE TRANSPLANTATION OF HUMAN ORGANS AND TISSUES ACT 1994" अजयला काहीच कळत नाही डॉक्टर असं का म्हणताहेत "काय सुरू आहे हे....?!" , इथे मी तुमच्या पाया पडतोय की माझ्या मुलाला वाचवा आणि तुम्ही....!?
हे सगळं मेघना ऐकत असते, तेवढ्यात तिच्या खांद्यावर तिला एक स्पर्श जाणवतो, ती मागे वळून पाहते, "मी डॉक्टर भार्गवी, मी समाज सेविका आहे... मेघनाला ते नाव ओळखीचं वाटतं. मी तुमच्या भावना समजू शकते पण थोडा विचार करा आज तुमच्या मुला मुळे किती लोकांचे जीव वाचतील... किती लोकांना " जीवन दान" मिळेल...", मेघनाला तिच्या भावाची आठवण येते, त्याला किडणि न मिल्यामुळे त्याचा झालेला मृत्यू... मेघना आणि अजय स्थिरावतात दोघं एकमेकांचा हात हातात घेतात आणि खुप वेळ तसेच बसले असतात...! शेवटी मेघना उठते स्वतःला सावरत डॉक्टर कडे जाते आणि अवयव दानाचा फॉर्म मागते...
अजय आणि मेघना तो फॉर्म भारतात...
"अमृतचे सगळे अवयव दानकरण्यात आमची हरकत नाही....!"
आणि दोघांच्या सह्या.....
मेघना ICU मध्ये जाते, अमृरच्या हृदयाचे ठोके ती पूर्ण जीव कानात ओतून ऐकते... त्याच्या डोक्यावरून शेवटचा हात फिरवते, तिच्या समोर अमृतच्या लहानपणा पासूनच्या सगळ्या आठवणी जीवंत होतात आणि ती अश्रूंना वाटा देते... तेवढ्यात तिची बाहेर नजर जाते, तिथे नूर उभी असते... भार्गवी... समाज सेविका.... नूर... हार्ट ट्रान्सप्लांट....! मेघना धावत बाहेर येते आणि नूरला घट्ट मिठी मारते...!
नूर आणि ताबस्सून मान खाली करून हात जोडून उभ्या असतात. त्या दोघींच्या डोळ्यात अजय आणि मेघनाला दुःख, कृतज्ञता आणि प्रेम ओसंडून वाहतांना दिसतं. नूर ऑपरेशन टेबलवर तिच्या स्वप्नांना पूर्ण होतांना बघत असते. तीने भाईजान गमावला असतो, पण जाता जाता त्याने तिची रक्षा करण्याचे वचन चोख बजावलेले असते. नूर शुद्धी वर येते आणि नवीन हृदया सोबत नवीन जीवन जगण्यास तयार असते. मेघना नूरच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिच्या हृदयाचे ठोके ऐकण्याकर्ता अलगद मान खाली नेते, तीला हृदयाचे ठोके ऐकू येताच आनंदाने ती अजयला जवळ बोलावते... "ऐक अजय अमृत जीवंत आहे...!" अजयचे डोळे पाणावतात, तो पण प्रेमाने नूरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो "जिती रहो बेटी...!"
मेघना आणि अजयला त्यांच्या दुःखाच्या गावातून बाहेर आणण्यात नूरचा खूप मोठा वाटा आहे...
अमृतचं "हृदय"आता नूरच्या शरीरात जगतय... नूरला MBBS ला ऍडमिशन मिळाली आहे. तिचा सगळा खर्च अजूनही अजय आणि मेघना करताहेत...
अमृर तर गेला पण जतानाहीं खूप लोकांना "जीवन दान" देऊन गेला....

-पौर्णिमा देशपांडे हातेकर.

"ही कथा आणि कथेतील पात्र काल्पनिक आहे आणि त्याच वास्तवतेशी संबंध नाही. कुठेही समानता आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा."

"जाणीव"


#जाणीव
#NewShortStory

आजची आपली  गोष्ट सुरु होते रजत आणि रागिनीच्या बेडरूम मध्ये 

मी रागिनी 
आमचं लग्न होऊन आता एक वर्ष झालय... मी आणि रजत पुण्यात एका छान सोसायटी मध्ये  १०व्य मजल्यावर राहतो 
रजत  एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर आहे. तो सारखा कामात व्यस्त असतो... मी पण आता नौकरी करायचा ठरवलंय म्हणजे मी पण बुसीय राहेल 
माझा एक महत्वाचा इंटेव्हिएव आहे लवकरच आणि त्याचीच तयारी मी करतेय   
आज रजत जरा लवकर आला, जेवण आटोपून आम्ही झोपायला गेलो 
गप्पा करता करता रजत ला कधी झोप लागली कालच नाही, मी पण झोपायचा प्रयत्न केला 
                       

                      अचानक अचानक दारावरची बेल वाजली, मला दचकुन जाग आली. अर्धवट झोपेत घड्याळ्यात पाहिलं, पहाटेचे ३ वाजले होते . मी जरा घाबरलेच, तेवढ्यात परत डोअर बेल वाजली, मी तडख उठले आणि अंधारात हळूहळू पाउलं टाकत हॉल मधे आले,सगळी कडे काळोख होता आणि नीरव शांतता. मी हॉलचा लाइट लावला हॉल मध्ये एक मोहक सुगंध पसरला होता डावीकडे नजर गेली तेव्हा लक्ष्यात आलं कि टेरर्स चा दरवाजा उघडाच राहिला होता आणि मोगरा फुलला होता पहिल्यांदा, तिसऱ्यांदा परत बेल वाजली मी भानावर आले आणि दारावर असलेल्या eye hole कडे माझी नजर गेली, ह्या क्षणी त्या आयहोलची खरी गरज मला समजली. पाऊलांचा आवाज न करता आयहोल मधून बाहेर पाहिलं आणि मी थबकले! बाहेर माझी आजी उभी दिसली...  मी ताबडतोब दार उघडलं तशीच गोरी पण, ठेंगणी, पांढरे शुभ्र केस, मोठ्ठ कपाळ कपाळावर अंडाकृती टिकली, सरळ धारदार नाक चेहऱ्यावर स्मित हास्य, गुलाबी काठाची पिवळी साडी नेसलेली , हातात दोन सोन्याच्या बांगड्या, 
तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं आणि एक प्रसन्न सुगंध दरवळत होता तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिले... तिला पाहून घळा घळा अश्रुधारा सुरु झाल्यात आणि मी तिच्याशी काही बोलणार तेवढ्यात ती बोलु लागली, "अग दार उघडायला किती वेळ लावलास, हे घे!" म्हणत माझ्या हातात तिने एक पांढरी शुभ्र चौकोनी जवळ पास 300 पानांची वही दिली, ती वही इतर वह्यांसारखी मुळीच नव्हती काहीतरी वेळग होतं त्या वहीत, हे जाणवत होतं. मला काही बोलायचा अवकाश न देता ती पुढे बोलू लगली... "ही वही खास तुझ्या करता आणली आहे, माझ्या कडून तुझ्यासाठी ही भेट! रोज रात्री झोपायच्या आधी ही वही उघडायची आणि लाल शाईच्या पेनाने तुला उद्याचा दिवस कसा हवाय ते लिहून काढायचे. पण अट अशी की दिवस कसा हवा ते फक्त एका ओळीतच लिहायचे आणि कुणी वाचणार नाही अश्या ठिकाणी ही वही ठेवायची. विसरु नकोस एकदा लिहायला सुरुवात केली की रोज लिहावच लागेल, रोज सकाळी उठून आधीच्या दिवसाचं पान फाडून पाण्यात सोडायचं! मी जाते आता, सुखी समाधानी राहा!" अस म्हणत ती चक्क निघूनही गेली... मी ह्या प्रकारातून बाहेर येते न येते तेवढ्यात जाणीव झाली की.... की आजीला जाऊन आज तब्बल एक महिना झालाय! ही इथे आली मला दिसली माझ्याशी बोलली माझ्या हातात चक्क वही दिली! मी किती तरी वेळ स्तब्ध होते  
डोळ्यातून अश्रू वाहत होते. आजी एक मीठी मारायची होतीग तुला परत तुझ्या पोटावरुन हात फिरवायचा होता... खुप खुप रडले मी, ती आता परत कधीच दिसणार नाही ही जाणीव खुप खुप दुखावणारी होती...
                 
                    पण स्वतःला सावरत मी ती वही उघडली, त्या वहीच्या प्रत्येक पानावर पान नंबर टाकलेला होता. कुतूहलाने मी शेवटचं पानं पाहीलं त्यावरचा आकडा "365" असा होता...! दुसऱ्या दिवशी माझा एक महत्वाचा interview होता लगेच लाल पेन हातात घेतला आणि लिहले देवा मला interview मध्ये यशदे...! आजी तुला माझी किती काळजी आहे गं आणि परत डोळ्यात पाणी आले, हा interview म्हणजे माझ्या करता बाकी सगळ्या गोष्टिं पेक्षा मोठा होता.

                    दुसऱ्या दिवशी उत्साहाने उठून मी interview ला गेले. Interview यशस्वी झाला. माझा आनंद गगनात मावेनासा होता. माझ्या हाती जादूची वही लागली होती! देवाचे आणि आजीचे कोटी कोटी आभार मानून मी मी देवपूचे गूळ खोबऱ्याचा नैवैद्य दाखवला 
पुढे रोज रात्री वही लिहीत गेले आणि तस तसं रोज घडतही गेलं. आधल्या दिवशीचे पान फाडायचे आणि पाण्यात  सोडायचे हा नियम पण चुकू दिला नाही...

                            एक दिवस, एका छोट्या कारणा मुळे रजत आणि माझं खूप मोठं भांडण झालं मी खुप वैतागले होते... रागा रागात वहीत लिहलं देवा मला जगायचा कंटाळा आलाय मला उद्याचा दिवस नाही बघायचा! असे लिहून मी वही बंद करून डोळ्यात अश्रू घेऊन झोपी गेले...! झोप येतंच नव्हती आणि अचानक जाणीव झाली की मी वहीत काय लिहिलंय आता तेच होणार उद्या मी जिवंत नसणार, ती जाणीव होताच काळीज पिळून निघालं पोटात गोळा उठला माझ्या मागे माझ्या लोकांना किती अतोनात दुःख होईल आणि माझ्या आयुष्यात मला करायच्या असणाऱ्या किरीतरी गोष्टी राहून गेल्या... आईनी प्रेमाने दिलेली साडी नाही नेसली, rajat माझं किती प्रेम आहे हे त्याला सांगायचे राहून गेले, आई बाबांचे त्यांनी मला दिलेल्या अगणित सुखां करता धन्यवाद मानायचे राहून गेले, जे लोक माझ्या मुळे दुखावले होते त्यांची माफी मागायची राहून गेली! माझ्या जवळच्या, प्रेमाच्या लोकांना भेटायचे राहून गेले... उद्या हे सगळं जगायला आपण नसणार ही जाणीवच खुप भयावह होती! हजारो गोष्टींनी डोकं भणभणू लागलं.
             
                     "Ragini, आगं ऊठ! आज काय झालय तुला.... आग 9 वाजलेत माझा डबा, मला उशीर होतोय ऑफिसला जायला...! मी ताडकन उठुन बसले! मला कळेचना काय होतंय... धावत जाऊन आधी वहीचा शोध घेतला, सुजयला समजेचना मी अशी का वागतेय... ती वही कुठेच नव्हती! ते सगळं काहीच झाल नव्हतं...! ते सगळं स्वप्न होतं! मी दोन मिनिटं केस मागे सरकवत स्तब्ध उभी होती... आणि भानावर येताच रजतला  मीठी मारून ढसा ढसा रडत होती... तो पण घाबरला,  आधी वाटलं आमच्या भांडण मुळे मी अस्वथ आहे ... त्यानी मला शांत केलं पाणी दिलं, काय झालं विचारताच मला पडलेलं स्वप्न मी त्याला सांगितलं... त्याच्या डोळ्यांच्या कडा पण पाणावलेल्या होत्या, त्याला पण जाणीव झाली की आपण जे आयुष्य जगतोय ते किती चुकीचं आहे! मिळालेला क्षण किती अनमोल असतो, आत्ताचा हा क्षण जगायचा! पुढच्याची काळजी नाही आणि गेलेल्या दिवसाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं... एका स्वप्ना मुळे आमचा आयुष्य कडे बाघायचा आणि जगायचा दृष्टिकोन इतका बदलून जाईल असं "स्वप्नात" सुद्धा वाटलं नव्हतं. आजी तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तु नसतांनाही तुला माझी काळजी आहे! हे सगळं बोलत असतांना त्याचा फोन वाजला फोन ऑफिस मधून होता.  11.00 वाजले होते वेळ कसा गेला आम्हाला समजलाच नाही... त्याने फोन वर लगेच सांगीतले आज येणार नाही! मग काय तर कामाच्या समुद्रात नखशिखान्त बुडालेल्या लग्न नंतर एकही सुट्टी न घेणारा रजत  सुट्टी घेतली आणि आजीने दिलेल्या शिकवणी नुसार खुप दिवसांपासून मनात असलेल्या सगळ्या गोष्टी बोलूंटकल्या, ज्या लोकांचे मन माझ्या मुळे दुखावले होते त्यांची मी माफी मागीतली, ज्या लोकांनां भेटावेसे वाटत होते त्यांना भेटलो, कोणत्याही खास प्रसंगाची वाट न पाहता आईने दिलेली साडी नेसले . ही जाणिवेची संधी सगळ्यांच्याच आयुष्यात यावी अशी ईश्वर चरणी मागणी केली. आणि हे सगळं केल्यावर एकदम हलकं झाल्या सारखं वाटलं अगदी पंख फुटवे आणि अलगद आकाशात उडाव असं...!

-पौर्णिमा देशपांडे हातेकर
+6585230946
9673338288

Wednesday, 29 November 2017

"हिवाळ्यातील एक सकाळ"

हिवाळ्यातील गुलाबी सकाळ...
स्वयंपाक घराच्या खिडकीतून डोकावणारी सूर्याची किरणं!
सुट्टीचा दिवस!
special breakfast time!
एक टुमदार गोलगुटूक गोरीपान चकचकीत कढई!
पटकन गॅस वर ठेवली आणि बर्नर ऑन!
गाईचं साजुक तुप,
उष्ण कढईत पडताच वितळलेलं...
दाणेदार शुभ्र रवा,
तुपात एकजीव झाल्या झाल्या, रव्यावर चढत गेलेली लाली...
आज कुछ special है!
घराच्या सगळ्या कोपऱ्यांना लागलेली चाहुल।
रव्याच्या खमंग सुगंधात पडलेलं दुध आणि मलई...
पूर्णत्वास नेणारा साखरेचा गोडवा।
उत्सुकता आणि भुक दोन्ही वाढलेली!
नवरेबुआला दुलईची ऊब सोडायला मजबूर करणारा खमंग गंध!
गोऱ्या गोमट्या कढईवर चढलेली ती लाली।
काजू, बदाम, केशर, पिस्ता, किसमिस ह्यांची होणारी लगबग,
शेवटी कढईतल्या रव्या भाऊंना भेटल्यावरची तृप्तता।
त्यात विलायची ची भर...
घरात (म्हणजे आपल्या व इतरांच्या) पसरलेला गोड सुगंध!
दोन सुंदर la'opala च्या bowls मध्ये मुदाळाने वाढलेला तो केशरी गुलाबी शिरा...!
दोघे एकत्र बसून आस्वाद घेतांना एकमेकांची भीडलेली नजर।
नजरेतून इशाऱ्याने त्याने खुणावलेली दाद...
शिऱ्याचा गुलाबी रंग नकळत तिच्या गालावर चढलेला...!
उबदार शिऱ्याच्या गोडव्याने गोड झालेली ती हिवाळ्यातली एक गुलाबी सकाळ...!

"आमचा खाऊन झाला तुम्ही कधी करताय?"


-पौर्णिमा देशपांडे हातेकर

Tuesday, 31 October 2017



                                                       "नव्याने उमगलेलं जुनं नातं"


#NewProject
#Excited
#ShortStory
#Happy

आता पर्यन्त मी माझ्या लहानपणी चे अनुभव लिहीत होती. आज पहिल्यांदा एक लघु कथा लिहायचा प्रयत्न केलाय, तुम्ही आत्ता पर्यन्त दिलेल्या प्रतिक्रियां नी मिळालेलं हे बळ, अशाच प्रतिक्रिया पुढे ही अपेक्षीत आहेत, तर नक्की वाचा आणि Like, share and comment... !

तर सादर आहे...
   

त्या तुफान पावसात ती सापडली होती. एक लांबच लांब रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजुनी असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावळ, अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करीत होती. पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या टिणावर कर्कश्य आवाज़ करत होते, रस्त्यावर कुणीच नव्हतं, होता तो फक्त गोलमोहराच्या फुलांचा पडलेला केशरी सडा. सैरावैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता, अचानक आलेल्या पावसा पासुन बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला, त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिल कॅब पण बुक करता येईना, आणि दुपारच्या वेळी सगळी दुकान बंद! तिला आता काळजी वाटू लागली, " मी घरी परत कशी जाणार? पाऊस कधी थांबेल, त्यात हा फोन.. ! आताच बंद पडायचं होतं ह्याला, मी आता काय करू? कुणाला मदत मागु?"

एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली, त्या रस्त्यावर तासाभरात तिला दिसलेले ते एकुलते एक वाहन, तिने हात दखावला नाही कारण अनोळखी रस्ता, त्यात अनोळखी व्यक्ती... तिला अजुन संकट नको होते, पण थोडच पुढे जाऊन ती कार हळूवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं, ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा! तिला एका क्षणी खुप आधार वाटला तर दुसऱ्या क्षणी खुप भीती वाटली. ड्राइवर सीटच्या बाजुची पावसामुळे अंधुक झालेली काच जशी हळूहळू खाली येत होती, हिच्या हॄदयाचे ठोके तसेच वाढत होते.

स्टेयरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हात, हातात नाजुक घड्याळ, लगेच तिने वर पहिले आणि तिच्या मनातील भीती ची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला. ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे ह्याचा तिला आनंदच झाला होता...

"मी तुमची काही मदत करू शकते का?" हा प्रश्न येताच, ही लगेच म्हणाली, "होय, मी, माझ नाव प्रिती, मी इथे एका कामाकरता आले होते, पण काम संपवून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला, माझ्या फोन ची बॅटरी पण संपली त्यामुळे मी कुणाला कॉन्टॅक्ट पण नाही करु शकत, तुमच्या फोन वरुन एक कॉल करू का?" , "ओह, सो सॉरी मी माझा फोन घरीच विसरलीये " दोघींना एकदम हताश वाटल, त्या कार मधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पाऊसात भिजत असलेल्या प्रिती कडे पाहिलं. पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजुक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होत, कोसळणाऱ्या पाऊसामुळे प्रितीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती, आणि एकंदरीत ती चांगल्या घराण्यातली वाटत होती. ती लगेच म्हणाली, " माझं नाव सुधा, मी इथे समोरच राहते, if you don't mind, तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा, इथे किती वेळ थांबाल?" प्रितीने दोन क्षण विचार केला आणि होकार दिला कारण तिच्या कडे दुसरा पर्याय नव्हताच!

समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमधे सुधा राहत होती, तीची स्वतःची एक फर्म होती, त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले असे ती प्रितीला सांगत होती. पावसाने सगळाच गोंधळ केला! प्रितीने पण सांगिलते की ती एका ऑर्डरच्या डिलीवरी करता आली होती, प्रिती एक प्रोफेशनल फोटग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा delivery boy सुट्टी वर असल्याने एक अर्जंट डिलीवरी द्यायला ती आलेली होती. सुधाची एक Event Management फर्म होती आणि सुधाच्या फोटोग्राफर ची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्याच शोधत बाहेर गेली होती पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बिझी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला प्रितीच्या रूपात एक तारणहारच जणु भेटली होती. त्या दोघींना एकमेकीं मधे एक वेगळाच आपलेपणा जाणवू लागला होता.

गप्पा सुरु असतानाच त्या सुधा च्या फ्लैट समोर पोहोचल्या, सुधाने बेल वजवताच दार उघडल, दार उघड़ल ते एका छोट्याश्या मुलीने, आणि ती लगेच गाऱ्हाणे करू लागली, "आई कुठे गेली होतीस, आम्ही कधीची वाट पहतोय..!", सुधा ने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला. ती लगेच म्हणाली, "चिऊ बघ कोण आलय माझ्या सोबत, ही प्रिती मावशी आहे तिला hi कर.."

चिऊ ने लगेच "Hi" म्हणटले व आईच्या येण्याची खबर द्यायला ती आत पळाली. सुधाने प्रीतीला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली. सुधा चे घर प्रसन्न होते, मोठा हॉल त्याला लागून एक टेरेस, टेरेस वर खुप सुंदर सजवलेली फुल झाडं, नीलम रंगाचा सोफा सेट, डायनींग आणि लिवींग स्पेस ला विभागणारं ते जाळीच लाकडी पार्टीशन...

ते घर प्रसन्न असल तरी प्रिती ला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती एक वेगळीच बेचैनी तिला स्वस्थ बसू देत नव्हती, जमिनीवर टाकलेल्या मऊ गलिच्यावर ती पायाच्या अंगठ्याने रेघा काढत त्या रेघा बघत होती, एकाहाताची मुठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती, तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टीशन च्या मागून एक व्यक्ति हळू हळू त्या पार्टीशन ला मगे सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती सुधा नव्हती, प्रितीच्या अंदाजाने तो सुधाचा नवरा असावा.

तिचा मोबाइल खाली पडला तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच समोर कुणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवल, आणि लगेच आवाज़ आला, "Hi", तो आवाज़ ऐकून तिच्या हॄदयाचा एक ठोका चुकला, तिने आश्चर्याने वर पाहिले आणि... कॉलज मधले ते अविस्मरणीय दिवस तिच्या समोर नाचू लागले, एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्या समोर झरा झरा येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवळच आली आणि ती त्याच्याकड़े आणि तो तिच्याकड़े स्तब्ध होऊन भान हरवल्यासारखे बघू लागले. तिचे डोळे अश्रूंनी डच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच सुधा बाहेर आली. इकडे प्रिती ची ही अवस्था होती पण सुयश आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो रुक्ष आणि अजाण दिसत होता. जणू त्याला तिच्या तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही, तो तिला ओळखतच नाही. प्रिती ने कसेबसे ते अश्रू आवरले, एक मोठा आवंढळा गिळला.

तितक्यात सुधाने ओळख करून दिली, " हा सुयश, माझा नवरा...! आणि सुयश, ही माझी तासाभरा आधी झालेली मैत्रीण प्रिती!, अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली, तुला माहिती आहे प्रिती माझ्या इवेंट करता माझी मदत करायल तयार पण झाली, I'm feeling blessed today...!" एकीकडे सुधा आनंदाने उत्साहने घड़लेल सगळ सविस्तर सांगत होती आणि एकीकडे प्रिती ला बाहेर पडणाऱ्या पाऊसच्या आणि ढगांच्या कडकडाटा ऐवजी कही काहीच ऐकू येत नव्हते. त्या थोड्या वेळा आधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या... सुयश सुद्धा तितक्याच धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता, प्रिती ने लगेच सुधाला वॉशरूम कुठय विचारले आणि तिथून थोडावेळ का होईना बाहेर निघायचा मार्ग शोधला. ती तिथून जाताच सुयश पण थोड़ा स्थिरावला.

प्रिती आत जाऊन ढसा ढसा रडली, तिला आता परत त्यादोघां समोर जायची हिम्मतच राहिली नव्हती, सुयश आणि प्रितीच एकमेकांवर जीवपाड प्रेम होत, त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पहिले होते, खूप खूप रंगीत चित्र रंगवले होते, पण दुर्भाग्याने ते वेगळे झाले होते.
तिला सुयश च वाक्य अठवलं, "या पुढे कधीच माझ्या समोर येऊ नकोस, आणि आलीस तरी मी तुला कधीच ओळखणार नही...!" आणि तिने पण त्याला वचन दिल होत की त्याला कधीच तिचा चेहरा दखावणार नाही, पण आज नियती ने त्यांना एकमेकां समोर आणून उभ केल होत आणि आता ह्यातून कसं बाहेर पडायच हा विचार दोघेही करत होते...!

प्रिती बाहेर आली तेव्हा फक्त सुधा तिथे बसली होती आणि चिऊ खेळत होती, प्रिती ला सुयश च तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होत, तिने लगेच सुधाला फोन मागितला, सुधा ने आत जाऊन फोन आणला, "हे काय? माझा फोन पण ड्रेन झालाय, चिऊ खेळत बसली असेल, थांब मी आलेच", सुधा ने तिला सुयश चा फोन आणून दिला, तिने लगेच तिच्या नवऱ्या ला, प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलावले पण पावसा मुळे त्याला यायला उशीर होणार होता, प्रीती ने लगेच cab बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी वापस निघुन आली... ती रात्र तिच्या करता न संपणाऱ्या काळोखा सारखी होती...
अचानक तिला आठवले, तिने प्रतीकचा फोन घेतला त्यातून रिसिव्हड कॉल्स मधून सुयश चा नंबर स्टोर करून घेतला.

दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं पण आता ते शक्य नव्हतं. तिने सुयश ला मेसेज पाठवाला, "Hi...", पण एक तास झाला तिला काहीच reply आला नही आणि तिने तिच्या कृती करता स्वतःला खूप कोसले... तब्बल तीन तासांनी सुयश चा reply आला... "Hi..."
प्रिती एका वेगळ्याच परिस्थितीत होती, ती हसत होती पण डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळत होते, मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती...
तिने थरथरत्या हातांनी त्याला लिहलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला तो असा...

प्रिती- "मला चुकीचं समजू नकोस त्या दिवशी जे काही झालं, तो फक्त एक योगायोग होता, मी तुला वचन दिल होत कि तुझ्या समोर कधीच येणार नही पण... शेवटी नियतीने इथेही मला दगा दिला... मला, तुझ्याशी खुप बोलयचे आहे रे, तुला खुप सांगायचे आहे तुझी माफी मगायची आहे, मी तुला दुखावलं त्या करता मी तुझी माफी मागते, माझा हेतू तुला दुखावण्याचा मुळीच नव्हता, तुझ्या पासून दूर जायचे मला ही तेवढेच दुःख आहे...
मला माफ करशील...?

सुयश- मी तुला माफ करणारा कोण? जे झालं ते होऊन गेलं, जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे...

प्रिती- Please, मला एकदा माफ कर

सुयश- Ok, if You say so...

प्रिती- Thank You... Thanks a lot... !

आणि प्रिती च्या मनावरचे खूप खूप मोठे ओझे उतरले. त्यानंतर एक दिवस प्रिती ने सुयश ला फोन केला, सुयश तसा तिच्यावर नाराज होताच कारण ती त्याला मधेच सोडून गेली होती. पण तो सुयश होता, झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला, त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार, रुक्ष पणा, एक अनोळखी पणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खुपत होता... प्रिती ने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगीतल्या, ती म्हणाली, "सुयश, मी तुला गमावलं ह्याचं मला दुःख आहे, पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटलं ते ह्याचं की तुझ्यातल्या त्या मित्राला मी गमावलं, तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही, तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात, खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं, तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस, सुधा खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात ह्यात दुमत नाही. मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत, आनंदात राहा...
पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही ह्याचं दुःख वाटतं"

सुयश हे एक प्रगल्भ व्यक्तीमत्व होत, आणि त्याला प्रिती च्या भावानांची पूर्ण जाणीव होती, मनाने हळवी, साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती... तिच्या फोन नंतर त्याला त्या दिवसांची आठवण झाली. तीचा तो सोज्वळ चेहरा, ते गोड हास्य, तिची काळजी, तिचा राग आणि त्यांचं भांडण व तिने दाखवलेला रुक्ष पणा. सगळ्या सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात, मनात भरून आल्या होत्या. त्याला खूप रागही येत होता आणि त्याच क्षणी तिच्याशी खूप खूप बोलावसं ही वाटत होतं पण त्याने स्वतःला आवरलं.०

त्या दिवशी प्रिती चा वाढदिवस होता... आता सुधा आणि प्रिती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या खूप प्रोजेक्ट्स त्यांनी मिळून केले होते, आणि त्या दिवशी सुधा ने प्रितीला surprise द्यायचा प्लॅन केला, सुयशला त्याच्या बायकोच म्हणणं टाळता नाही आल, ते तिघं केक, फुलं आणि गिफ्ट घेऊन प्रिती च्या घरी जायला निघालेत... सुयश, वेगळ्याच मनस्थितीत होता. त्या दिवशी नंतर त्या दोघांनी एकमेकांन समोर येणे कटाक्षाने टाळले होते, परीक्षेला जातांना जी अस्वस्थता जाणवते तिच त्याला जाणवत होती. मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ आनंद तर दुसऱ्या बाजूला तिच्या बद्धल असणारा राग ह्या संमिश्र भावनांनी त्याच मन दाटून गेलं होतं.

लिफ्ट च दार उघडलं आणि समोरच एक फ्लॅट होता, दारावर पाटी होती मिस्टर ऍण्ड मिसेस कारखानीस, सुयश ला तो दिवस आठवला ज्या दिवशी प्रिती त्याच्या सोबत शेवट चं बोलली होती आणि तीला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानीस!
सुधा ने बेल वाजवली, प्रितीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, सुधा, चिऊ आणि त्यांच्या मागे उभा सुयश... त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले, प्रिती चे डोळे तराळले, तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. सुधा ने प्रिती ला मीठी मारली आणि फुलं दिली, मागून प्रतीक आला त्याने त्या तिघांना वेलकम केलं, प्रिती धावत आत गेली स्वतःच्या भावनांना सावरत बाहेर आली. सुयश आधी कोड्यात पडल्यागत सुन्न होऊन बसला होता जे होत आहे ते सत्य आहे ह्याचे त्याला भानच नव्हते. समोर भिंतीवर लावलेल्या फोटोंवर सुयश च लक्ष गेलं, ती आणि प्रतीक एकमेकां सोबत खुश होते हे पाहून त्याला कुठे तरी स्थिर वाटलं. प्रिती ने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच सजवलं होता. तसेच फिकट रंगाचे पडदे, त्याच सगळ्या फुलांची झाडं, सगळं तसंच. प्रतीकनेच मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग सुयश आणि प्रतीक बोलण्यात अगदी गुंग होऊन गेलेत. प्रिती चे ते निखळ हास्य त्यांनी खूप वर्षयांनी ऐकलं होतं, पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसवत रहाणारी प्रिती आता हरवली होती. त्याला कुठे तरी ते जाणवलं आणि तीची ही अवस्था आपल्या न बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली... त्या दिवशी प्रिती सोबत घालवलेले ते काही तास सुयश ला जुन्या आठवणी उजळून द्यायला पुरेसे होते. त्याला जुनी प्रिती आठवली, ती प्रिती जी त्याची जीवा भावाची मैत्रीण होती, ती प्रिती जी निरागस आणि मनानी अगदी लहान मुलीसारखी होती, ती प्रिती जिला सुयश त्याच्या मनातलं सगळं सगळं सांगायचं, आणि काही गोष्टी न सांगता सुध्दा तिला समजायच्या, ती प्रिती जी क्षणा क्षणा ला जोक्स सांगून हसवायची हसायची, दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम्स सोडवायचे आणि एकमेकांसाठी खंबीर उभे असायचे सतत! कुठे तरी सुयश पण प्रिती च्या पवित्र मैत्रिला मिस करत होता... खूप गप्पा आणि डिनर आटोपून सुयश, सुधा आणि चिऊ घरी परतले.

रात्री चे पावणे बारा वाजले होते, प्रिती चा मोबाईल बीप झाला, तीने थकलेल्या हातांनी तो हातात घेतला, स्क्रीन वरच नोटिफीकेशन पाहून तीच्या आनंदाला पारावार राहीला नाही... तो मेसेज सुयश चा होता...

"Happy Birthday... I'm, Delighted to have a friend like you, now and forever...!"
- Suyash

त्यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला स्वीकारलं होत, मैत्रीच्या नात्याला...
माणूस कधीच वाईट नसतो परिस्थीती वाईट असते हे त्या दोघांना ही कळून चुकले होते... मैत्री चं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोकं भाग्यवान असतात ह्यात दुमत नाही!

अशीच उमगतात नव्याने जूनी झालेली नाती...!

-पौर्णिमा

Wednesday, 6 March 2013

Aai..

Tu asavi javal , manat nehmi watata...
Kantha datuni yeto tevha pani dolyaat datata...

Kimmat aaichi dur gelyavar kalta ...
Hey sangne aaiche tichya pasun kharach dur gelyavar umajata.....