Wednesday, 29 November 2017

"हिवाळ्यातील एक सकाळ"

हिवाळ्यातील गुलाबी सकाळ...
स्वयंपाक घराच्या खिडकीतून डोकावणारी सूर्याची किरणं!
सुट्टीचा दिवस!
special breakfast time!
एक टुमदार गोलगुटूक गोरीपान चकचकीत कढई!
पटकन गॅस वर ठेवली आणि बर्नर ऑन!
गाईचं साजुक तुप,
उष्ण कढईत पडताच वितळलेलं...
दाणेदार शुभ्र रवा,
तुपात एकजीव झाल्या झाल्या, रव्यावर चढत गेलेली लाली...
आज कुछ special है!
घराच्या सगळ्या कोपऱ्यांना लागलेली चाहुल।
रव्याच्या खमंग सुगंधात पडलेलं दुध आणि मलई...
पूर्णत्वास नेणारा साखरेचा गोडवा।
उत्सुकता आणि भुक दोन्ही वाढलेली!
नवरेबुआला दुलईची ऊब सोडायला मजबूर करणारा खमंग गंध!
गोऱ्या गोमट्या कढईवर चढलेली ती लाली।
काजू, बदाम, केशर, पिस्ता, किसमिस ह्यांची होणारी लगबग,
शेवटी कढईतल्या रव्या भाऊंना भेटल्यावरची तृप्तता।
त्यात विलायची ची भर...
घरात (म्हणजे आपल्या व इतरांच्या) पसरलेला गोड सुगंध!
दोन सुंदर la'opala च्या bowls मध्ये मुदाळाने वाढलेला तो केशरी गुलाबी शिरा...!
दोघे एकत्र बसून आस्वाद घेतांना एकमेकांची भीडलेली नजर।
नजरेतून इशाऱ्याने त्याने खुणावलेली दाद...
शिऱ्याचा गुलाबी रंग नकळत तिच्या गालावर चढलेला...!
उबदार शिऱ्याच्या गोडव्याने गोड झालेली ती हिवाळ्यातली एक गुलाबी सकाळ...!

"आमचा खाऊन झाला तुम्ही कधी करताय?"


-पौर्णिमा देशपांडे हातेकर